‘शिवसेनेच्या स्थापनेनंतरच…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | शिवसेना आज 56वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आज वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेबद्दल भरभरून बोलले आहेत.

अब तक 56 और भी आगे जायेंगे, असं राऊत यावेळी म्हणाले. तर सध्याचं राजकारण हे प्रादेशिक पक्षाच्या जीवावर चाललं असल्याचं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

या सर्वाचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना दिलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तर प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवरच देशाचं राजकारण उभं असल्याचंही राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या स्थापनेनंतरच देशात प्रादेशिक पक्षांच्या स्थापनेला सुरूवात झाली, असंही राऊत यावेळी म्हणाले.

एक प्रादेशिक पक्ष काय करू शकतो हे शिवसेनेनं दाखवून दिलं आहे. शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे, असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं आहे. तर विधानपरिषद निवडणुकीवरूनही राऊतांनी भाष्य केलं आहे.

विधानपरिषद निवडणुकांसाठी काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी आप-आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे.

दरम्यान, मतांवर दरोडा पडू नये यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याचं संजय राऊत म्हणाले. तर महाविकास आघाडीची दोन मतं कमी करण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सशक्ततेच्या दिशेने वाटचाल”

विधानपरिषद निवडणुकीपुर्वी एकनाथ खडसे आणि राम शिंदेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘या’ कारणामुळे साजरा करतात फादर्स डे, वाचा महत्त्व आणि इतिहास

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ, गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ