विधानपरिषद निवडणुकीपुर्वी एकनाथ खडसे आणि राम शिंदेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून प्रतिस्पर्धींच्या भेटीने नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सर्व पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. भाजपने त्यांच्या उमेदवारांना ताज हॉटेलमध्ये तर राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं आहे.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे व भाजप नेते राम शिंदे यांची ट्रायडंट हॉटेलबाहेर भेट झाली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राम शिंदे भाजपचे उमेदवार असून राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना संधी देण्यात आली आहे. त्यात या दोन नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीची बैठक संपवून एकनाथ खडसे हॉटेलमध्ये परतत असताना या दोन कट्टर प्रतिस्पर्धींची भेट झाली. या दोन नेत्यांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे मात्र गुलदस्त्त्यात आहे.

राम शिंदे व एकनाथ खडसे दोघेही आधी भाजपमध्येच होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी काही काळापूर्वी भाजपला रामराम ठोकला व राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दरम्यान, एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडले असले तरी त्यांचा नेत्यांसोबतचा जिव्हाळा कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘या’ कारणामुळे साजरा करतात फादर्स डे, वाचा महत्त्व आणि इतिहास

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ, गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

“10 तारखेला महाविकास आघाडीच्या पत्त्याचा बंगला हलला, आता 20 तारखेला कोसळणार”

किर्तनावेळी व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला इंदुरीकर महाराजांचा सज्जड दम, म्हणाले…