मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचा रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार ऑगस्ट क्रांती दिनी (09 ऑगस्ट) केला. यावेळी त्यांच्या गटाच्या नऊ आणि भाजपच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शिवसेनेत बंड करुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांसोबत अपक्ष (Independent) आमदार देखील गेले होते. त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपदाची आस होतीच. पण शिंदे यांनी यावेळी त्यांच्या तोंडाला पाने पुसली.
त्यामुळे अपक्ष बंडखोर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे नाराज होते. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली होती. त्याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाष्य केले आहे. ते पुण्यात माध्यमांसोबत बोलत होते.
आमच्याकडे दोन अपक्ष मंत्री आहेत. दोघांपैकी एकाला मंत्रिपद दिले असते, तर ते चांगले दिसले नसते. बच्चू कडू ज्येष्ठ आहेत आणि एका पक्षाचे ते अध्यक्ष देखील आहेत. आमचे ते प्रिय आहेत. त्यांना दुसऱ्या विस्तारात योग्य मान देण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले.
संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिपदावरुन भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रान उठविले आहे. त्यावर देखील केसरकरांनी भाष्य केले. राठोडांवरचे आरोप जूने आहेत. त्यांची चौकशी झाली होती. त्यात ते दोषी आढळले नसल्याने आता त्यांना मंत्री केले गेले असल्याचे केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाला एक मंत्रिपद देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी वचनाची जाणिव ठेवत बंजारा समाजातील संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याचे केसरकर म्हणाले.
शिवसेना सतत आमच्यातील काही लोक त्यांच्यात परत जाणार असे म्हणत आहे. परंतु जेव्हा आम्ही जोर लावला त्यावेळी त्यांच्यातील अनेक लोक आमच्यात आले. आम्ही जर भविष्यात एकत्र राहिलो तर त्यांच्यातील अनेक जण आमच्या गटात येण्याची शक्यता असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे.
उठाव करण्यासाठी ध्येय लागते. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक असलेल्या लोकांत ते नाही. त्यामुळे ते तेथेच राहिले. प्रसंगी ते ध्येय दाखवू शकले नाहीत, नाहीतर एक – दोन वगळता सगळेच्या सगळे आमच्या या उठावात सहभागी झाले असते, असा दावा देखील केसरकरांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
‘भाजपमध्ये आता फक्त फडणवीस एकटेच…’; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका
‘बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान’
आरे कारशेडवरुन ठाकरे आणि फडणवीस यांची जुंपली; फडणवीस म्हणाले ‘ठाकरे आपल्या अहंकारा…’
“जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस”; काय आहे प्रकरण?
“रवी राणा यांना हिंदू धर्मरक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे”