भय्यू महाराज प्रकरणाला नवं वळण; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

भोपाळ | दिवंगत अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पलकने तांत्रिकाला 25 लाखांची सुपारी दिली होती. तांत्रिकाच्या मदतीने भय्यूजी यांना मनोरुग्ण बनविण्याचं कटकारस्थान पलकने रचलं होतं, अशी माहिती पुढे आली आहे.

पलकच्या मोबाईलमधून तिची ‘जिजू’शी होणारं व्हॉटस्अॅप चाट पोलिसांच्या हाती लागली होती. त्यात ती भय्यूजी महाराजांसाठी ‘बीएम’ या कोडवर्डच्या मदतीने तिच्या साथीदारांशी चर्चा करीत होती.

जिजू नामक साथीदारांशी चॅटिंग करताना तिने ‘बीएम को पागल बनाकर घर मे बिठाना है… तांत्रिक को 25 लाख की सुपारी दी है’, असं म्हटल्याचं उघड झालं होतं.

या चॅटिंगच्या आधारेच तिच्याविरुद्ध इंदूर पोलिसांना भक्कम पुरावे गोळा करता आले, अशी माहिती समोर आली आहे. भय्यूजी महाराजांसोबत लग्न करून त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीची ‘वारस’ होण्याची या कटामागे पलकची योजना होती.

दरम्यान, दिवंगत अध्यात्मिक भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गो.ळी झाडून आ.त्म.ह.त्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अ.टक केली होती. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पलकने भय्यू महाराजांसोबत काही अश्लील व्हिडीओ बनवले होते.

अटकक केलेल्या दोन सेवकांद्वारे ती भय्यू महाराजांचा ब्लॅकमेल करत होती. तीने भय्यू महाराजांसोबत लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव देखील टाकला होता. मात्र त्यांनी आयुषीसोबत लग्न केलं होतं.

पलकसह दोन्ही आरोपींचा भय्यू महाराज यांच्या संपत्तीवर डोळा होता. त्यासाठी त्यांनी काही योजना आखल्या होत्या, याच योजनांद्वारे त्यांनी भय्यू महाराज यांचे अश्लील व्हिडीओ बनवले होते.

या माध्यमातून भय्यू महाराजांना धमकी दिली जायची. त्यामुळे भय्यू महाराजांचा मोठा धक्का बसला होता. ते चांगलेच खचले होते. याच कारणामुळे नैराश्यात गेले होते.

महत्वाच्या बातम्या- 

“मिस कॉल देऊन जगातला मोठा पक्ष व्हायचं नाही”; नानांचं भाजपवर टीकास्त्र

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!