विजमंत्र्यांना पक्षश्रेष्ठींनी दिला जोराचा शाॅक! नितीन राऊत यांची गच्छंती

मुंबई | राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. राज्याचे विजपुरवठा मंत्री नितीन राऊत यांना आपल्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाला मुकावं लागलं आहे. पक्षश्रेष्ठींनी राऊत यांच्याकडून राजीनामा घेतला आहे.

राज्याचे मंत्री असण्यासोबतच राऊत यांच्याकडं अखिल भारतीय एस-एसटी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कारभार होता. पण आता त्यांच्याकडून पक्षानं राजीनामा घेतला आहे. कारण अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.

अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीकडून राऊत यांच्या जागेवर आता राजेश लिलोठिया यांना संधी देण्यात आली आहे. परिणामी राऊत यांना पदावरून हटवण्यात आल्यानं सध्या सर्वत्र तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

काॅंग्रेसनं राऊत यांना हटवल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. काही दिवसांपूर्वीच राऊत दिल्लीला पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले होते. परिणामी या राजीनाम्याची कल्पना त्यांना त्या बैठकीतच देण्यात आल्याचं बोललं  जात आहे.

नितीन राऊत हे गेल्या तीन वर्षांपासून या पदावर कार्यरत होते. महाराष्ट्राच्या नेत्याकडं काॅंग्रेसमध्ये असलेली ही सर्वात मोठी जबाबदारी होती. सध्या महाराष्ट्राचे काॅंग्रेसच्या केंद्रीय समितीमध्ये प्रतिनिधीत्व फार कमी झालं आहे.

काही दिवसांपूर्वी नागपुर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका विधानपरिषद जागेसाठी निवडणूक झाली. यामध्ये काॅंग्रेसला तोंडावर पडण्यासारखा पराभव स्विकारावा लागला होता.

नागपुरमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात रोखणाऱ्या काॅंग्रेसनं आपल्याच एका चुकीच्या निर्णयानं पराभवाला आमंत्रण दिलं होतं. परिणामी काॅंग्रेस पक्षश्रेष्ठी नितीन राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळत होती.

नितीन राऊत हे सध्या नागपुरचे पालकमंत्री आहेत. मात्र त्यांच्यात आणि नागपुर जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला विजयी करणारे सुनिल केदार यांच्यात विधान परिषद निवडणुकीत समन्वय नसल्यानं पक्षाला पराभव स्विकारावा लागल्याची चर्चा होती.

दरम्यान, राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी 27 डिसेंबरला निवडणुक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांना अध्यक्ष करण्यासाठी काॅंग्रेसनं ही खेळी खेळल्याचीही चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”

मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका” 

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर