Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

महेश भट्ट गजाआड जाणार? ‘या’ बड्या अभिनेत्रीचे महेश भट्ट यांच्यावर धक्कादायक आरोप!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणंच लागलं आहे. सुशांत प्रकरणानंतर इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी सुशांत प्रकरणानंतर इंडस्ट्रीवर गंभीर आरोप केले आहेत.

बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट हे गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत चर्चेत आहेत. सुशांत प्रकरणी महेश भट्ट यांच्यावर सुरुवातीपासूनच अनेक आरोप करण्यात आले होते. अशातच आता अभिनेत्री लविना लोधने हिने महेश भट्ट यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लविना हिने इन्स्टाग्राम वरून एक व्हिडिओ शेअर करत महेश भट्ट यांच्यावर आरोप केले आहेत.

मी महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याच्याशी लग्न केलं होतं. त्याच्याविरोधात मी घटस्फोटाचा अर्ज केला आहे कारण तो सपना पब्बी, आमयरा दस्तूरसारख्या अभेनेत्रींना ड्र.ग्ज पुरवठा करायचा मला हे समजलं होतं. या सर्व गोष्टींची माहिती महेश भट्ट यांना आहे. महेश भट्ट सर्वात मोठे डॉन आहेत आणि ते पूर्ण सिस्टीम हँडल करतात, असा आरोप लविनाने केले आहेत.

जर तुम्ही महेश भट्ट यांच्या म्हणण्यानुसार वागला नाहीत तर ते तुमचं जगण मुश्कील करून टाकतात. महेश भट्ट यांनी किती तरी लोकांना कामावरून काढून त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे. ते फक्त एक फोन करतात आणि लोकांची नोकरी जाते, असाही आरोप लविनानं केला आहे. तसेच लविनानं महेश भट्ट यांच्या विरोधात त.क्रार केल्याचं देखील सांगितलं आहे.

मी महेश भट्ट यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मी तक्रार दाखल केल्यापासून ते माझ्या घरात घुसून मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पोलीस ठाण्यात एनसी करायला जाते तेव्हा कोणीच माझी एनसी घेत नाही आणि एनसी घेतली तर त्यावर कारवाई होत नाही, असंही लविनानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

जर मला किंवा माझ्या कुटुंबासोबत काही घडलं तर महेश भट्ट, मुकेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल जबाबदार असतील. बंद दरवाजामागे हे लोक काय करतात ते लोकांना माहिती तर हवं. कारण महेश भट्ट खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली आहेत, असाही आरोप तिनं केला आहे.

दरम्यान, कंगना राणावत आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हाच फोटो राखी सावंतनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोला राखीनं ‘सुशांत प्रकरणाला नवं वळण’ असा कॅप्शन दिला  होता.

राखी सावंतची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली होती. महेश भट्ट आणि कंगणाच्या या फोटोवरून अनेक लोक त्यांच्यावर टीका करत होते.

 

View this post on Instagram

 

I m being harrased by Mahesh Bhatt & family. Pls support.

A post shared by Actor | Luviena Lodh (@luvienalodh) on

महत्त्वाच्या बातम्या-