आप करणार बेरोजगारी साफ! पंजाब सरकारनं युवकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

चंदीगड | देशाच्या राजकारणात अवघ्या दहा वर्षाच्या काराकिर्दीत दोन राज्यात सत्ता मिळवण्यात आम आदमी पक्षानं यश मिळवलं आहे.

दिल्लीत सत्ता मिळवल्यानंतरही आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सातत्यानं दिल्लीत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर नाराजी दर्शवत होते.

केजरीवाल यांनी अनेकदा आपल्याला पूर्ण राज्यात सत्ता हवी असल्याचं म्हटलं होतं. परिणामी आता पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आपनं कामांचा धडाका लावला आहे.

पंजाबमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

पंजाबमधील बेरोजगारी संपवण्याच्या दिशेनं त्यांनी पाऊल टाकलं आहे. पंजाब सरकार महिनाभरात तब्बल 25 हजार सरकारी जागा भरणार आहे.

राज्यातील तरूणांसाठी पोलीस दलात तब्बल 10 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय मान सरकारनं घेतला आहे.

आम आदमी पार्टीनं आपल्या जाहीरनाम्यात पंजाबमधील बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. परिणामी आपल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पोलीस दलासोबतच इतर विभागातील रिक्त 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. याअगोदर मान यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिम चालू केली होती.

पाहा ट्विट – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 नारायण राणेंच्या अडचणीत पुन्हा वाढ; BMCनं दिला ‘हा’ मोठा दणका

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर”