मुंबई | उन्हानं आता सर्वांच्या अडचणीत भर टाकायला सुरूवात केली आहे. सर्वत्र सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.
काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सांगली शहरात भर उन्हात पाऊस पडल्यानं उन्हाची दाहकत लक्षात येते.
भर उन्हात थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसानं सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सांगली आणि मिरज शहरात पाऊस पडला आहे.
येत्या 48 तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. परिणामी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाच क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही काळात हे क्षेत्र ईशान्य आणि मध्य भारतात धडकण्याची शक्यता आहे.
हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर चक्रीवादळात झाल्यास उष्णतेत वाढ होणार आहे. वाढत्या तापमानाच्या झळा विदर्भ आणि खान्देशाला बसणार आहेत.
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या पुढ पारा गेला आहे. येत्या काही दिवस तरी उष्णतेत अशीच झपाट्यानं वाढ होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये
“पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”
कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर”