मुंबई | मंत्री धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचं अकाली निधन झालं.
आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण करुणा शर्मा यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे.
करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असतील अशी माहिती आहे.
माझा लढण्याचा कोणताही विचार नव्हता. एक महिन्यांपूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन आले तेव्हा अनेक लोक, उमेदवार भेटले. निवडणुकीला मी उभं राहावं अशी सर्वांची इच्छा होती, असं त्यांनी सांगितलं.
आज इतके पक्ष आहेत आणि 13 कोटी जनता आहे. पण परमबीर सिंग सारख्या व्यक्तीला देश सोडून जावं लागलं. आज इतका भ्रष्टाचार सुरु असून कोणीही आवाज उठवत नाही. मी आवाज उठवला असून निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!
कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले…
‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
“भाजपचा शिमगा रोज सुरूये, आम्ही शिमगा सुरू केला तर…”
“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”