पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई, बड्या भाजप नेत्याला अटक झाल्याने खळबळ

पुणे | आरोग्य विभागात झालेल्या पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

आरोग्य विभागाच्या पेपर कुठे प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संजय सानप याचं मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावलं असल्याचंही बोललं जात आहे.

म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत आहेत. म्हाडा पेपरफुटीवरून हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आलेत. त्यामुळे भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटलं होतं.

जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला देखील बंगळूरमधून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.

या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता.

सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांना अटक केलीये. यापूर्वी डेरेंना निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सुपेच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार” 

कोरोनामुक्त पुरुषांसाठी जास्त घातक ठरतोय Omicron?; संशोधनातून हैराण करणारी बातमी समोर 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही” 

“सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवली नाहीत” 

काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का?