पुणे | पुणे महापालिका निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी एकीकडे भाजप जोर लावत आहे. भाजपडून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे अनेक बडे नेते मैदानात उतरले आहेत. तर दुरीकडे राष्ट्रवादी पुणे पुन्हा काबीज करण्यासाठी जोर लावत आहे. अशात राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप यांनी केलेल्या या दाव्याने पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसातच पुणे महापालिकेसह इतर मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
प्रशांत जगताप यांचा हा दावा खरा ठरल्यास आगामी निवडणुकीत भाजपची चिंता वाढू शकते, मात्र प्रशांत जगताप यांनी याआधीही असा दावा केला आहे.
पुण्यावर अजित पवारांचं विषेश लक्ष नेहमीच राहिलं आहे. तर शिवसेनाही आगामी महापालिका निवडणुकीत जोमाने उतरण्याच्या तयारीत आहे. तर मनसेकडून राज ठाकरे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज ठाकरेंनी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात बैठकांचा सपाटा लावताना दिसून येत आहे. तर शिवसेनेकडून पुणे जिंकण्याची जबाबदारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना देण्यात आली आहे. अशातच जगताप यांनी केलेल्या या दाव्याने भाजपच्या गोटातही खळबळ माजली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
याच वेळी जगताप यांनी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका आपण शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठीकडे मांडणार आहोत, असं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…
काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय
मोठी बातमी! एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी होणार रतन टाटांची
‘धोका टळलेला नाही…’; WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा
‘असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं’; केसरकरांचा राणे पितापुत्रांवर हल्लाबोल!