मुंबई | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thombre) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केलीये.
आवरा वहिनी स्वतःला, जर भाऊ आवरत नसेल तर तुम्हीच तुमचं स्वतःला आवरा अन्यथा मानसिक संतुलन बिघडलं म्हणून तुम्हाला उपचार घ्यावे लागतील, असं म्हणत रूपाली पाटील ठोंबरे यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
आमचे विरोधीपक्ष भाऊ (देवेंद्र फडणवीस)आडवतच नाहीत, आमच्या वाहिनीला कसल्याही गोष्टीत, आणि याचं प्रचंड दुःख होतं. कारण मिसेस माजी मुख्यमंत्री अमृता वहिनीसाहेबांनी या पदाची गरिमा धुळीला मिळवली आहे, असं रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
नामर्द, नॉटी नवाब, बिघडे पटोले, नन्हे पटोले म्हणतात थोडक्यात उत्तर द्यावे…50 मार्क्स, नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? तसेच रिक्त स्थानाची पूर्ती करा…50 मार्क्स, _____शराब नही होती! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है असे म्हणतात, असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.
अगोदर अमृता फडणवीस यांनी सांगावं की, त्या कोणत्या पक्षाच्या आहेत. तुम्हीच सांगितलं की, माझा कोणत्याही पक्षाशी काहीही संबंध नाही. मी समाजसेविका आहे. मग एक समाजसेविका असताना तुमची अशी भाषा समाजात कशी चालणार आहे? तुम्ही नक्कीच महाविकास आघाडीसरकारमधील लोक काम करत नसतील तर त्याच्यावर बोललं पाहिजे. मात्र तुमची अशी भाषा समाजात कशी चालणार? त्यामुळे मला आमच्या भावाला सांगायचं आहे की, भाऊराया वहिनीसाहेब खूप अंधाधूंद वागत आहेत, अशा शब्दात रूपाली पाटील यांनी अमृता फडणवीसांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…
काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय
मोठी बातमी! एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी होणार रतन टाटांची
‘धोका टळलेला नाही…’; WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा