Top news महाराष्ट्र राजकारण

भाजपला मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

जळगाव | महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. बऱ्याच दिवसांपासून राजकारणात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच नाव आपल्या समोर येत आहे. अलीकडे एकनाथ खडसे भाजपमधीलच काही नेत्यांची नावं घेत त्यांच्यावर आरोप करत आहेत.

एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे खडसे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर या देखील पक्षांतर करतील, अशी चर्चा चालू आहे. एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे देखील भाजपच्या तिकिटावर खासदारपदी निवडून आल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्याबरोबर त्या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतील का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

रक्षा खडसे भाजपच्या तिकिटावर रावेर मतदार संघातून खासदारपदी सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. भाजपने महाराष्ट्र कार्यकारणीत मंत्रीपदाची जबाबदारी रक्षा खडसे यांच्याकडे दिली आहे. यामुळे रक्षा खडसे काय निर्णय घेतात यावर सर्वांचच लक्ष लागून आहे.

एकनाथ खडसे यांच्यासह खडसे यांच्या संपर्कातील जवळपास 15 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे येत्या काही दिवसांतच महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र, खडसे यांनी अद्याप राष्ट्रवादीचा झेंडा अधिकृतपणे हाती घेतला नाही. दोन दिवसांपूर्वीच खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य होतं. खडसे खासगी कामानिमित्त जळगावमध्ये आले होते. यावेळी ते आपल्या निवासस्थानी असताना पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत मला काहीही बोलायचं नाही. नो कमेंट्स, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाच्या मुहूर्तावरही मिश्किल प्रतिक्रिया दिली होती.

मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत. ते सर्व मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनीच ठरवले आहेत. म्हणजे माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सर्व मुहूर्त तुमचेच, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी माध्यमांनी राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता अंकिता लोखंडे विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल होणार?

‘केबीसी’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, जी पाहून अमिताभ बच्चन सुद्धा चकित झाले!

अर्णब गोस्वामीला मोठा धक्का! आता ‘या’ प्रकरणी पाय आणखी खोलात

‘…म्हणून वडिलांचा जीव वाचवता आला नाही’; रितेश देशमुखनं सांगितलं विलासरावांच्या मृ.त्यूचं खरं कारण

भडकावू बातम्या पसरवणाऱ्या वाहिन्यांविरोधात पार्लेजी कंपनीनं घेतला मोठा निर्णय