मुंबई | अभिनेत्री पायल घोषनं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला होता. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनुरागवर अनेक गं.भीर आ.रोप केले होते. पायल घोषनं 22 सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध दखलपात्र गु.न्हा देखील दाखल केला होता.
अशातच आता याप्रकरणात पायलनं अनुरागनंतर खेळाडू इरफान पठाणचं नाव घेतलं आहे. अनुरागनं आपला विनयभं.ग केल्याचं इरफानला माहित होतं मात्र त्यानं आता मौन धरलं आहे, असं म्हणत पायलनं अनेक गंभीर आरोप इरफानवर केले आहेत. पायलनं यासंबंधित एक ट्वीट केलं आहे.
अनुराग कश्यपनं माझ्यावर जबरदस्ती केल्याचं मी केव्हा बोलले नाही. मात्र, इरफान पठाणला हे सर्व माहित होतं. माझा चांगला मित्र समजून मी इरफानला सर्व काही सांगितलं होतं. मात्र, इरफाननं आता याप्रकरणी मौन धरलं आहे, असं ट्वीट पायलनं केलं आहे.
क्रिकेटपटू इरफान खान यानं अद्याप पायलच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे इरफान आता याप्रकरणी काय प्रतिक्रिया देतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, पायलच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
पायलच्या या ट्वीटनंतर इरफानच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलं. मात्र, यावर लगेच पायलनं इरफान आणि तिचा एक फोटो शेअर केला आणि ट्रोलर्सला उत्तर दिलं.
मी इरफानला टॅग केलं याचा अर्थ असा नाही की, तो मला आवडतो. मी इरफानला अनुरागनं माझ्यावर जबरदस्ती केल्याचं सांगितलं होतं. मी अपेक्षा करते की, मी इरफानला अनुराग बद्दल जे काही सांगितलं त्याबद्दल त्याने बोलावं, असं पायलनं दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पायलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अनुरागवर आणखीही काही गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासमोर गां.जा ओढला होता, असा आरोप पायलनं व्हिडीओतून केला आहे. पायलनं ट्वीटरवरून हा व्हिडीओ शेअर करत त्यासोबत कॅप्शनही दिला आहे.
थोड्याश्या विस्तृत गोष्टीनं आणि सत्यानं कोणालाही काहीही कष्ट होणार नाही. दोषीला बाहेर येवून त्याचं खंडन करूद्या. चला सत्याचा शोध घेऊ. यानं जर तुमच्यातील महिला जागी होत नसेल आणि तुमच्या आतील माणसाला न्याय मिळवायचा नसेल तर माहित नाही हे कोणाकडून होईल, असं कॅप्शन पायलनं या व्हिडीओ सोबत दिलं आहे.
I have definitely not talked about mr. kashyap raped me but I shared everything with @IrfanPathan about the conversations including (xyz) alas!! he is keeping mum inspite of knowing everything and once he claimed to be my good friend.
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 17, 2020
The point of tagging @IrfanPathan doesn’t mean I have any interest in him but he’s the one I have shared everything about Mr. Kashyap but not d rape thing.. I know he believe in his faith and his elderly parents so I expect him to talk about whatever I shared wd him. pic.twitter.com/hMwNklY4r9
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपला मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता अंकिता लोखंडे विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल होणार?
‘केबीसी’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, जी पाहून अमिताभ बच्चन सुद्धा चकित झाले!
अर्णब गोस्वामीला मोठा धक्का! आता ‘या’ प्रकरणी पाय आणखी खोलात
‘…म्हणून वडिलांचा जीव वाचवता आला नाही’; रितेश देशमुखनं सांगितलं विलासरावांच्या मृ.त्यूचं खरं कारण