मुंबई | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका बसला आहे. समीर वानखेडे यांच्या मुंबईतील बारचा परवाना रद्द होणार असल्याचं कळतंंय.
नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 मध्ये देण्यात आला होता.
या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. आता या बारचे लायसन्स ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं आहे.
समीर वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच, वयामध्ये विसंगती असल्याचं कारण देण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावेळी वयाच्या सतराव्या वर्षी वानखेडेंना बारचा परवाना मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बारचा परवाना मिळाला त्यावेळी समीर वानखेडे सतरा वर्षाचे होते. त्यामुळे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी बारचा परवाना कसा मिळाला, असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता.
उत्पादन शुलेक विभागाच्या नोंदीनुसार हॉटेल सदगुरूचा परवाना समीर वानखेडेंच्या नावावर आहे. ते 27 ऑक्टोबर 1997 रोजी जारी करण्यात आले आणि नियमानुसार त्याचे नूतनीकरण करण्यात आले. ते 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे.
महत्वाच्या बातम्या-
वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता…
“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”
अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…
काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय