वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने (BJP) कडाडून टीका केली आहे. आता सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाला होत विरोध चिंतेचा विषय नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांनी सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचं मला वाईट वाटण्याचं कारण नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे, असं पवारांनी सांगितलं.

देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये 18 वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात, असं पवारांनी सांगितलं आहे.

ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचं कारण नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

शरद पवारांनी यावेळी बोलताना पाच राज्यांच्या निवडणुकीवर देखील भाष्य केलं आहे. आंदोलनामुळे केंद्र सरकारने कायदे मागे घेतले पण त्यांच्या आश्वसनांची पूर्तता आद्याप झालेली नाही. यामुळे याची किंमत भाजप सरकारला मोजीव लागणार असल्याचं शरद पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”

अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…

काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय 

मोठी बातमी! एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी होणार रतन टाटांची