राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा झटका!

मुंबई | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. आपल्या आमदारांना सुरक्षित ठेऊन अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.

महाविकास आघाडीचं राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार जेलमध्ये आहेत. या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

या याचिकेवर नुकतीच मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा झटका आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला आहे. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नसल्याचा दावाही ईडीने न्यायालयात केला.

बुधवारी दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला. त्यानंतर गुरुवारी न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…” 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “ 

राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार 

“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे 

हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे