मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याला मोठा झटका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर राणा दाम्पत्याचा अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तेसच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती.
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केलेली. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळलीये.
मुंबई उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळल्याने राणा पती-पत्नीचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.
न्यायालयाने सुनावणी दरम्यान राणा दांपत्याला फटकारलं आहे. दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास 72 तासांची नोटीस द्यावी असं कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे.
जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषकरून लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावं आणि वागावं असं आम्ही वारंवार म्हटलं आहे. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात. लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणं चुकीचं आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर सोनिया गांधींनी उचललं मोठं पाऊल!
“…तरच राज्यातील मशिदींवर असलेले भोंगे हटवण्यात येतील”
‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण
“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”
‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल