नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 2024 च्या निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत. प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावानंतर सोनिया गांधी यांनी मोठं पाऊल उचललं आहे.
सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन एक सक्षम कृती गट 2024 तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हा गट 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी काम करणार असल्याचं कळतंय.
प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावावर माध्यमांनी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी या बैठकीबाबत माहिती माध्यमांना दिली. तसेच या बैठकीत काय झालं याबाबत त्यांनी सांगितलं.
सोनिया गांधी यांनी एक सक्षम कृती गट 2024 स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा ते तयार होईल, तेव्हा आम्ही त्याच्या प्रत्येक सदस्याबद्दल आणि त्यांच्या भूमिकांबद्दल माहिती देऊ, असं सुरदेवालांनी सांगितलं आहे.
10 जनपथमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, सुरजेवाला, जयराम रमेश आणि प्रियंका गांधी उपस्थित होते.
या बैठकीत प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय निर्णय झाला, त्याची माहिती अद्याप देण्यात आली नाही. तसेच प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात असल्याचं कळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तरच राज्यातील मशिदींवर असलेले भोंगे हटवण्यात येतील”
‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण
“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”
‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल
‘राष्ट्रपती राजवट लागू करा…लै मजा येईल…’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं खळबळजनक ट्विट