राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा (NCP) धक्का बसला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर हायकोर्टही ठाम आहे.

नवाब मलिकांना मतदानाचा हक्क कोर्टानं नाकारला आहे. आता या याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ पोलीस बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी मलिकांचे वकिल करणार आहेत.

सहाव्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेल्या महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, 10 जून रोजी विधानभवनात होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेता यावा यासाठी एक दिवसापुरता तात्पुरता जामीन किंवा मतदानाला जाऊ देण्याची मुभा द्यावी, अशी विनंती दोघांनी अर्जांद्वारे केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या गोटात खळबळ 

आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आमचे चारही उमेदवार विजयी होतील- संजय राऊत 

MIM चा पाठिंबा कोणाला?; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट सांगितलं 

“…तर आम्ही काही बांगड्या घातल्या नाहीत, बाकी काही पेटलं तरी चालेल” 

‘या’ आमदाराने शिवसेनेचं टेंशन वाढवलं; पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर