एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या गोटात खळबळ

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपतील अनेक जण पक्ष सोडून माझ्यासोबत येण्यास तयारही आहेत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आल्यानंतर भाजपमध्ये एक वेगळं राजकारण सुरु झालं आहे आणि त्या राजकारणाचे परिणाम आम्ही सगळे भोगतोय, असा आरोपच यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे.

जो विश्वास NCP ने माझ्यावर दाखवला तो मी सार्थ ठरवेन, असं म्हणत एकनाथ खडसेंनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

विधानसभेला माझं तिकीट नाकारुन या ठिकाणी नाथाभाऊ राजकीय विजनवासात जाईल अशा स्वरुपाची व्यवस्था झाली. परंतु अशा अडचणीच्या कालखंडात माननीय शरद पवार, प्रफुल पटेल, अजितदादा, जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन मला या ठिकाणी विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे, असं खडसे म्हणालेत.

सुरुवातीला माझ्यावर आरोप लावले, चौकशी लावली आणि आता एवढ्या जोरात चौकशी सुरु होती की, माझं घर खाली करण्याची देखील नोटीस देण्यात आली होती, अशी खदखद यावेळी एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-  

आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आमचे चारही उमेदवार विजयी होतील- संजय राऊत 

MIM चा पाठिंबा कोणाला?; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट सांगितलं 

“…तर आम्ही काही बांगड्या घातल्या नाहीत, बाकी काही पेटलं तरी चालेल” 

‘या’ आमदाराने शिवसेनेचं टेंशन वाढवलं; पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर 

“देश नही झुकने दुंगा विसरलात का?, भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा”