नितेश राणे यांना मोठा झटका; कोठडीत मुक्काम वाढला

मुंबई | राज्यात सध्या राणे कुटुंबीयांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणेंच्या अडचणी वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे.

भाजप नेते नितेश राणेंविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना आणखी एक दिवस कोठडीत मुक्काम वाढला आहे.

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.

लता मंगेशकर निधनामुळे सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राणेंची उद्याची सुनावणी पुढे ढकलली आहे.

1 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं. अशातच नितेश राणे यांना मोठा झटका बसल्याचं समोर येत आहे.

नितेश राणेंची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. पण, आता या प्रकरणी मंगळवारी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, न्यायालयीन कोठडीनंतर नितेश राणेंची जिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांची तब्येत बरी नसल्यानं लागलीच राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलं.

नितेश राणेंना पोलीस कोठडीत आणखीन काळ नेण्यात येऊ नये असा युक्तीवाद केला होता. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  लतादिदी अनंतात विलीन; अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदीसह अनेकांची हजेरी

  “मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये”

  ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार

 बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त