मुंबई | भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.
लतादिदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादिदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारो लोक आले होते.
लतादिदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदींनी अंत्यदर्शन घेत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही वाहिली श्रद्धांजली. याशिवाय राज्यपाल भगतसिंग कोशारी शिवाजी पार्क इथे उपस्थित होते.
दरम्यान, मागच्या 29 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान लतादिदींनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्गजांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये”
ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार
बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त
ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू