राज ठाकरेंना धक्का?, हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर शहराध्यक्ष असलेले वसंत मोरे यांनी मशीदीवरील भोंग्याबाबत मात्र वेगळी भूमिका घेतली. मी माझ्या प्रभागात अशाप्रकारचे स्पीकर लावणार नाही, ही ठाम आणि सर्वसमावेशक भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेचे एकीकडे स्वागत होत असले तरी पक्षांतर्गत मात्र विरोध होताना दिसत आहे.

वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. राज ठाकरे यांच्याशी बोलण झाल नाही. त्यांनी बोलावलं तर भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचं आहे, असंही ते म्हणाले होते.

तर त्यामुळे आलेल्यांनी मला सांगू नये, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं, अशी टीका त्यांनी पक्षाच्याच सहकाऱ्यांवर विशेषत: प्रदेश सरचिटणीस असलेले हेमंत संभूस यांच्यावर केली.

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नाराज झालेल्या मनसेच्या काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. यावर वसंत मोरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी या कार्यकर्त्यांची भेटही घेतली. फेसबुक पोस्टही केली.

एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही, त्यांच्या या वाक्याचे वेगवेगळे संदर्भ घेतले जात आहेत. हा अप्रत्यक्ष इशाराही मानला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर 2 लाख रूपये भरपाई मिळणार”, नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स

हनीमूनच्या रात्री असं काय झालं?, बायको रागानं लालबुंद झाली अन्…

“राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यास आश्चर्य वाटू नये”

“अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर…”