“…तर 2 लाख रूपये भरपाई मिळणार”, नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | लोकसंख्येच्या बाबतीत भारत येत्या काही वर्षामध्ये चीनला देखील मागे टाकण्याची शक्यता आहे. भारतात जन्मदर मागील काही वर्षापासून कमी होतोय. तर मृत्यूदर वाढत असल्याचं देखील अहवालातून समोर आलं होतं.

भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाण हे जगात सर्वांधिक आहे. या बाबतीत भारत जगात अव्वल आहे. अशातच रेस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

नितीन गडकरी यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली आहे. रस्ते वाहतूक योजनेच्या अंतर्गत अपघातग्रस्तांना भरपाई देण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं.

रस्ते अपघातग्रस्तांना भरपाई म्हणून याआधी 12,500 रूपये मिळत होती. आता ही भरपाई 50 हजारपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याला योजने अंंतर्गत नियम देखील लागू असतील.

त्यातबरोबर मृत्यू झाल्यास 25 हजारांची भरपाई देण्यात येत होती. त्यावर आता 2 लाखपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी वाहतूक मंत्र्यालयाने एक निवेदन देखील जारी केलंय.

दरम्यान, रस्ते अपघातात अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावं लागलं आहे. तर जखमी होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स

हनीमूनच्या रात्री असं काय झालं?, बायको रागानं लालबुंद झाली अन्…

“राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यास आश्चर्य वाटू नये”

“अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर…”

जगाचं टेन्शन वाढलं! कोरोनानंतर आता Rhinovirus एन्ट्री; डाॅक्टर चिंतेत