सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता

मुंबई | शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशाा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहान करून देखील आमदारांनी ठाकरेंकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. आता खासदार देखील उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार श्रीरंग बारणे, संजय जाधव, भावना गवळी यांच्यासह जवळपास 10 हून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आता समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शिवसेना नेत्यांना भावनिक आवाहन केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिवसेनेत फूट सुरूच आहे.

18 पैकी 10 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याने आता उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला 13 आमदार होते. नंतर हा आकडा वाढून 22 आणि नंतर 35 झाला. शिंदे यांच्या बंडानंतरही शिवसेनेसोबत काही आमदार होते.

गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दीपक केसरकर, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे आमदारही शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ 

‘तुम्ही ठरवा, आता शिवसेनेची जबाबदारी तुमची’; आमदारांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल 

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल! 

“आमचा विठ्ठल चांगला, अवतीभवतीच्या बडव्यांमुळे आमचा विठ्ठल बदनाम होतोय” 

मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल