पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल, पाहा आजचा दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. परंतू गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे.

सोमवार म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरच्या किंमतीमध्ये तब्बल 35 पैशांची वाढ झाली होती. मात्र आज कोणतही वाढ झालेली नसल्यामुळे प्रति लीटरचा दर सारखाच राहणार आहे.

त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 102.52 रूपये आहे. तसेच पॉवर पॅट्रोलचा दर 115.73 रूपये असल्याची माहिती समोर येतं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 105.84 रूपये आहे आणि डिझेलचा दर 94.57 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात”

“सामान्य माणसाला अच्छे दिन यावे, महागाई नसावी हेच नरेंद्र मोदींचं ध्येय”

अजित पवारांना या छाप्यांनी फारसा पडणार नाही- रामदास आठवले

‘माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव’; ‘या’ नेत्याने उघड केलं गुपित

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल- छगन भुजबळ