शिंदे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ प्रकरणांचे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढले

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यापासून जुन्या सरकारला एकापाठोपाठा एक धक्के दिले जात आहेत.

अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारने आरेतील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिल्याचंही पाहायला मिळालं

नव्या सरकारनं महत्त्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) हातून काढून सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप नेते गिरीष महाजन यांच्यासह इतर 28 जणांविरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा तसंच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल (Phone Tapping Case) लीक प्रकरणाशी संबंधित गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक झटका दिला आहे. जुन्या सरकारच्या काळात गेल्या 15 महिन्यांमध्ये मंजूर झालेली, निविदा काढलेली, कार्यादेश काढूनही सुरू न झालेल्या कामांना नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण 

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये” 

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…