मुंबई | प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी याने सोशल मीडियावर धक्कादायक पाऊल उचललं आहे. अदनान सामीने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत.
अदनानने अचानक सर्व पोस्ट डिलीट करून सोशल मीडियाचा निरोप घेतल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळांनाही सुरुवात झाली आहे.
अदनानच्या या पोस्टनंतर चाहते त्याबाबत विविध शक्यता व्यक्त करत आहेत. यासोबतच अदनानच्या या शेवटच्या पोस्टवर चाहते प्रश्न विचारत आहेत आणि कमेंट करत आहेत.
अदनाना सामीचे इंस्टाग्रामवर हजार फॉलोअर्स आहेत. तो स्वतः देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि दररोज नवीन पोस्ट शेअर करतो. याशिवाय अदनान सामीने त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केल्याने त्याची फॅन फॉलोइंग आणखी वाढली आहे.
फिटनेसबाबत लोकं त्यांना खूप फॉलो करतात. अदनाना अनेकदा त्याचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करतो. मात्र त्याच्या या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”
“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”
नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई
शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
“शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं”