महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत ‘या’ केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

मी अमित शाहांना एक पत्र लिहिणार आहे. त्यांना भेटणारही आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहे, असं आठवले म्हणालेत.

विरोधकांना सातत्याने त्रास दिला जाणार असेल तर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. सरकार बरखास्त करण्याची वेळ नक्की येईल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी नोंदवलेला जबाब आणि आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, या पार्श्वभूमीवर भाजप चांगलीच आक्रमक झालीये.

सरकारकडून दडपशाही सुरु असून पोलिसांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय.

सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सरकार करत असल्याची टीका भाजप नेते करत आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात! कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले; वाचा भाव

 कोरोनाचा पुन्हा उद्रेक! चीन सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारतासह जगावर परिणाम होणार

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला