सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे दर

पुणे | भारतीयांसाठी सोनं म्हणजे जीव की प्राण आहे. सोनं घालून मिरवणं एवढंच नाही तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून भारतातील लोक सोन्याला प्राधान्य देतात. सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले काही दिवस भारतात सोन्याच्या किमतीत सातत्याने चढउतार अनुभवायला मिळत आहे. आणखी काही दिवस सोन्याच्या दरात अशीच चढउतार राहिल, असे अभ्यासक बोलत आहेत. अशातच कालपासून सोन्याच्या दरात मोठी घट अनुभवायला मिळत आहे.

एमसीएक्सवर आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 390 रुपयांची घट पाहायला मिळाली आहे. 390 रुपयांच्या घटीसह सध्या एमसीएक्सवर सोन्याच्या दर 46 हजार 390 रुपये प्रती तोळा आहे.

सोन्यासह आज चांदीच्या दरात देखील मोठी घट अनुभवायला मिळाली आहे. चांदीच्या दरात आज किलोमागे तब्बल 1200 रुपयांची घट झाली आहे. 1200 रुपयांच्या घटीसह एमसीएक्सवर सध्या चांदीचा दर 61 हजार 600 रुपये प्रती किलो आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये सोने-चांदीचे दर खूप खाली उतरले होते. मात्र, येत्या काही दिवसांत सोने-चांदीचे दर वाढतील असे अनेक अभ्यासक बोलत आहेत. यामुळे साने-चांदी खरेदी करण्याची हीच संधी मानली जात आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.

या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्वाच्या बातम्या-

वाह रे पठ्ठ्या! पोलिसांनी गाडी उचलून नेल्यानं पुणेकरानं थेट बांधलं स्कूटीचं स्मारक

आजीने आजोबांना केलं किस; आजोबांनी जी प्रतिक्रिया दिली ती पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

एका ग्लासामुळे नवरदेवाचं आलं खरं रूप समोर, पाहा व्हिडीओ

लग्न झाल्याच्या खुशीत नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

आपल्या मृत मुलाला सोंडेत घेऊन जातानाचा हत्तीणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक