कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी मोठी अपडेट समोर!

पुणे | कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या खुनाच्या प्रकरणात 6 जणांना जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावणी आहे.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबन कानकाटे याच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सदरिल प्रकरणात मोठी घडामोड घडल्यानं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

28 मे 2015 ला ऊरूळी कांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची उरूळी कांचन रस्त्यावर पहाटेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणात 15 जणांवर पोलिसांनी दोषपत्र दाखल केलं होतं. प्रकरणात विष्णू जाधव याच्यासह 6 जणांना दोषी ठरवत न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

प्रकरणातील मुख्य आरोपी गोरख कानकाटे याला सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे. याअगोदरच गोरख कानकाटे हा भाऊ लोंढेच्या खुन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

संतोष मिनराव शिंदे, निलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनिल महाडिक, विष्णू यशवंत जाधव आणि नागेश लखन झाडकर यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 भोंग्याच्या वादावर केंद्रीय मंत्र्याची राज ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले…

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर 

“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”

सेक्स लाईफबाबत दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य, म्हणाली…