सत्ता जाताच मागं लागली साडेसाती! इमरान खान यांच्या अडचणीत वाढ

मुंबई | मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर पाकिस्तानात अखेर नवीन सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकार स्थापन होताच माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इमरान खान यांच्या संपत्ती आणि मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी पाकिस्तानात गोंधळ निर्माण झाला आहे.

इमरान खान सरकारमधील त्यांच्या काळातील व्यवहारांवर शरीफ सरकारची नजर असल्याचं आता उघडकीस आलं आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय संस्थांना पत्र लिहून शरीफ सरकारनं इमरान खान आणि त्यांच्या पक्षाशी निगडीत सर्व खात्यांची माहिती मागवली आहे.

इमरान खान यांचा पक्ष पीटीआयला विदेशातून 2013 पासून किती निधी मिळाला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.

फेडरल इन्वेस्टीगेशन एजेन्सी द्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यातील भल्यामोठ्या रकमेची चौकशी करण्यात येत आहे. जगभरात इमरान खान यांच्या समर्थक वित्तीय संस्थांकडून माहिती घेण्यात येत आहे.

दरम्यान, इमरान खान यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशात पाकिस्तानमध्ये परत एकदा राजकीय अस्थिरता माजण्याची चिन्ह दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास 

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता