चंद्रकांत पाटील भडकले; ठाकरे सरकारला दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होत असल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. न्यायालयानं सांगितल्यानंतरही सरकारनं ओबीसी आरक्षणाकडं कानाडोळा केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

ठरवून मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आता ओबीसी आरक्षणाबाबत देखील तशीच भूमिका सरकार घेत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षण नसेल तर महापालिका, पंचायत, नगरपालिकांमध्ये आरक्षण कसं मिळेल?, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आता या महाविकास आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहीजे, असा इशारा पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सरकारला दिल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 सत्ता जाताच मागं लागली साडेसाती! इमरान खान यांच्या अडचणीत वाढ

 मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास 

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले