मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात 15 दिवसांची जमावबंदी

मुंबई | कोरोनानं गेल्या दोन वर्षापासून जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. कोरोनाची लाट ओसरत असून सगळं पूर्वपदावर येत आहे.

कोरोनाचे नियमही आता हळूहळू शिथिल होत आहेत. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राज्यातील गडचिरोली जिल्हयात आता कोरोनामुळे 15 दिवसांची जमावबंदी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.

राज्यात 2 एप्रिल रोजी गुडीपाडवा, तर 10 एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुकीसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. याचा अंदाज घेता गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी लावण्यात येत आहे.

27 मार्च 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधित जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येत आहे. या 15 दिवसांसाठी नागरिकांनी जास्त सावधानता बाळगण्याची गरज आहे.

दरम्यान, कोरोना अद्याप पूर्णपणे नष्ट झाला नसून त्याचे व्हेरियंट डोकं वर काढत असतात. त्यामुळे धोक्याची भीती कायम धडकी भरवत असते.

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रूग्णसंख्या हजारांहूनही कमी झाली आहे त्यामुळे नागरिक गाफील झालेले पाहायला मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “आशिष शेलारांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायेत”; शिवसेनेचा पलटवार

  Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल महागलं, वाचा ताजे दर

  IPL 2022: देवदत्त पेडिक्कलचा कॅच वादाच्या भोवऱ्यात; अंपायरच्या निर्णयावर SRH नाराज; पाहा व्हिडीओ

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘येत्या 14 एप्रिलला…’

 “आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”