1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं अनेकांचं जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत करुन टाकलं होतं. आता पुन्हा सगळं पूर्वपदावर येत आहे.

कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे निर्बंधांमध्येही शिथिलता पहायला मिळत आहे. अशातच आता कोरोना निर्बंधांविषयी ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्रात कोरोना निर्बंधातून मुक्तता मिळणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारकडून सांगण्यात येणार आहे.

येत्या 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील करण्यात येण्याची शक्यता आहे. आज नाहीतर गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

निर्बंध शिथील केले तरी मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर आलेले निर्बंधदेखील हटणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रूग्णसंख्या हजारांहूनही कमी झाली आहे त्यामुळे नागरिक गाफील झालेले पाहायला मिळत आहेत.

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात 15 दिवसांची जमावबंदी

  “आशिष शेलारांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायेत”; शिवसेनेचा पलटवार

  Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल महागलं, वाचा ताजे दर

  IPL 2022: देवदत्त पेडिक्कलचा कॅच वादाच्या भोवऱ्यात; अंपायरच्या निर्णयावर SRH नाराज; पाहा व्हिडीओ

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘येत्या 14 एप्रिलला…’