मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग

मुंबई | शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या दुराव्यानंतर 2019मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार समजले जातात.

अशातच संजय राऊत यांन आज सकाळी 10 च्या सुमारास शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं दिसत आहे.

संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर मुंबईत हालचालींना वेग आल्याचं दिसून आलं. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला.

तर दुसरीकडे नवाब मलिकांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच आता शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बैठक पार पडली आहे.

अशातच आता संजय राऊत यांनी थेट राजभवन गाठत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. संजय राऊतांच्या राज्यपाल भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत राजभवनात गेल्यानंतर काही वेळानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि जास्मिन वानखेडे देखील राज्यपालांच्या भेटीसाठी पोहचल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष राजभवनाकडे लागलेलं दिसतंय.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोपाची मालिका सुरूच ठेवली आहे. त्यानंतर आता मलिकांनी आता आपला मोर्चा भाजपकडे वळवला आहे.

समीर वानखेडें यांच्याकडून ड्रग्ज प्रकरण काढून घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता हा वाद शांत होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, आता क्रांती रेडकर यांनी थेट राजभवन गाठल्याने चर्चेला आता नवं वळण लागलं आहे.

आम्ही आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. आम्ही त्यांनी रितसर अर्ज देखील दिला आहे, असं क्रांती रेडकर म्हणाल्या आहेत.

नेहमी सत्याचा विजय होत असतो. त्यामुळे यावेळी देखील सत्याचाच विजय होईल, असंही रेडकर म्हणाल्या आहेत. राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही मात्र, सत्याचा विजय होईल ,असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजभवनावर नेमकं काय शिजतंय याकडे आता सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”

“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?” 

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”