चंदीगड | पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
मानसा येथे सिद्धूवर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
पंजाबमधील आप सरकारने काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोपर्यंतच सिद्धू मुसे वाला यांची हत्या करण्यात आली.
अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात सिद्धू मुसे वाला यांचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत.
पंजाब सरकारने कालच 424 लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धक्कादायक घटना घडली आहे
दरम्यान, मुसा वाला यांनी 2022 साली काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंग यांनी पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी ! मान्सून केरळमध्ये दाखल, ‘इतक्या’ दिवस आधीच आगमन
“आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही”
“धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे….”
मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्यांसह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
‘या’ ठिकाणी आढळला कोरोना नवा व्हेरियंट, 7 जण बाधित