मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीच्या चर्चा सुरु आहेत. 6 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून त्याची प्रतिक्षा लागून आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राजकीय वर्तुळात खळबळ सुरु आहे. अशातच भाजपकडून राज्यसभेसाठी दोन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.
भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती. त्यामुळे कोणाचं नाव जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे.
पियुष गोयल यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतु, अनिल बोंडे यांचे नाव अनपेक्षित असताना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी ! प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसे वाला यांची हत्या
मोठी बातमी ! मान्सून केरळमध्ये दाखल, ‘इतक्या’ दिवस आधीच आगमन
“आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही”
“धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे….”
मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्यांसह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल