मुंबई | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 6 जागांकरिता निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापुर, धुळे, अकोला, नागपूर, गोंदिया-भंंडारा या जागांचा समावेश आहे. येत्या 10 डिसेंबरला मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याचं दिसतंय. या सहा जागांमध्ये रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरीश पटेल, गिरिश व्यास आणि गोपीकिशन बाजोरिया यांचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे याठिकाणी निवडणूक होणार आहे.
सोलापुर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी कार्यकारी मंडळ कार्यरत असल्याने सोलापूरची निवडणूक लांबणीवर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार कोट्यातून निवडूण द्यायची 8 जागांची मुदत येत्या डिसेंबर अखेर पर्यंत संपणार होती.
मात्र, सोलापूर आणि अहमदनगर येथे पात्र संख्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक नसल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे तर 14 डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
विधानपरिषद निवडणूक अधिसुचना 16 नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. या निवडणुकीकरिता अर्ज करण्याची तारिख 23 नोव्हेंबर असणार आहे. तर अर्ज माघार घेण्याची तारीख 26 नोव्हेंबर असणार आहे.
या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार की तीन पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत अजुन स्पष्टता नाही. या अगोदर काँग्रेसने अनेकवेळा स्वबळाचा नारा दिला होता. याकारणास्तव काँग्रेस स्वबळावर निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने बळ वाढवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. यामुळे ही निवडणूक चांगलीचं रंगणार असल्याचं दिसत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधान परिषद जागांकरिता शिवसेनेमधील अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
यावेळी शिवसेनेकडून अनेक नेत्यांचं पुर्नवसन होणार असल्याचं बोललं जातयं. शिवसेना पराभुत उमेदवारांना संधी देणार की बाहेरून आलेल्या नेत्यांकरिता जागा राखीव ठेवणारं याकडे सर्वांच लक्ष आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रामदास कदम हे सद्यस्थितीत विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र, शिवसेनेकडून रामदास कदम यांना यावेळेस डच्चू मिळण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला विधान परिषदेत संधी दिली जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना नविन उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेनेत सचिन अहिर, सुनिल शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्या आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची आमदारकीसाठी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. तसेच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग
“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”
“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”
‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट
“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”