नवी दिल्ली | दिवाळीमध्ये प्रत्येकजण काहीतरी नविन खरेदी करत असतो. त्यातच आता भारतीय बाजारातील सर्वात मोठी ऑटो सेक्टरमधील कंपनी मारूती सुझुकीने एक नवीन कार लाँच केली आहे.
भारतात मोठ्या गाड्यांना चांगली मागणी असते. सध्या भारतीय बाजारपेठेत अशा अनेक आरामदायी कार उपलब्ध आहेत. मागील काही वर्षात भारतात मारूती सुझुकी स्विफ्ट सर्वात लोकप्रिय कार ठरली आहे.
तरूणांमध्ये स्विफ्टची मागणी जास्त असते. अशातच आता मारूती सुझुकीची स्वस्तात मस्त अशी नवी कार आता लवकर बाजारात आली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये मारूती सुझूकी कंपनीने 11 हजार रूपयांमध्ये फॅमिली कार बुकींग सुरूवात केलेली आहे. 10 नोव्हेंबरला बहुचर्चित Maruti Suzuki celerio कार कंपनीकडून लाँच करण्यात आली.
मारूती सुझूकी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून टोकण रकमेवर सुरूवात झाली होती. Maruti Suzuki celerio कार लाँच करण्यापुर्वी कंपनीने टीझर जारी केलेला होता. नवीन लाँच होणारी सिलेरियो 6 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
या नविन रंगांमध्ये आर्क्टीक व्हाईट, सॉलिड फायर रेड, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टनिंग ग्रे, स्पीडी ब्लु, कॅफिन ब्राऊन या रंगांचा समावेश असणार आहे. हॅचबॅक सिलेरियो नवीन रुपात- 2021 Maruti Suzuki Celerio लाँच करणार आहे
कंपनीकडून लाँच करण्यात येणारी सिलेरियो कार LXI, VXI, ZXI, आणि ZXI+ या चार ट्रीम्समध्ये असणार आहे. तसेच सात व्हेरिएंटमध्ये देखील असणार आहे.
यामध्ये चार व्हेरीएंट मॅन्युअल आणि तीन व्हेरिएंट ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसह असणार आहेत. नविन सिलेरियो कारमध्ये टचस्क्रिन इनफोटेन्मेंट असण्याची शक्यता आहे.
सिलेरियो कारची किंमत 4.65 ते 6 लाखांच्या रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अनेकांचं कार घेण्याचं स्वप्न आता लवकरच पुर्ण होणार आहे.
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वांत मोठी ऑटो सेक्टर कंपनी आहे. त्यामुळे मारुतींच्या गाड्याची भारतात मोठी मागणी असते. अशातच आता सिलेरियो कारला देखील मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मारुती सुझुकी ऑटो सेक्टर मधील एक आग्रगण्य कंपनी आहे. मारूतीकडे मोठ्या संख्येत सीएनजी गाड्यांचा ताफा आहे. सीएनजी गाड्यांचा बाबतीत देखील मारुती सुझुकी ऑटो सेक्टरमधील एकमेव कंपनी मानली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
खवय्यांना महागाईचा दणका! हाॅटेलचं जेवण तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार
“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”
“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”
‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट
“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”