मोठी बातमी! ‘या’ महिन्यात होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. अशातच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा वाद रंगला आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही घटनाबाह्य आहे, असं म्हटल्यानंतर आता राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद निर्माण झाला होता.

राज्य सरकारने तीन वेळी पत्र पाठवून देखील राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता होती.

राज्यपालांच्या नाराजीनंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी सरकारला रद्द करावी लागली होती. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन देखील अध्यक्षांविना पार पडलं आहे.

अशातच आता आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांबाबत निर्णय होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपद अद्याप खालीच आहे.

राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, त्यांनी राजकारण करून नये, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे आता विधानसभेचं अध्यक्षपद कोणाला मिळणार यावर आता सस्पेंस कायम आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक ही गुप्त पद्धतीने होत होती. मात्र, त्यात बदल करण्यात आला होता. आता ही निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता.

दरम्यान, राज्य सरकारने आवाजी पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध

“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”

काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव

नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे