मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक विद्यार्थी राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी करत होते. अशातच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
अवघ्या काही दिवसांवर असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची माहिती दिली आहे.
2 जानेवारी 2022 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, आता ही परीक्षा पुढे ढकलल्याने आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करिता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, असा निर्णय शासनाने घेतला होता. 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णय घेण्यात आला होता.
याकरिता 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
कोरोनामुळे अनेक उमेदवारांना परीक्षांना मुकावं लागलं होतं. त्यामुळे उमेदवारांचं वय वाढल्यामुळे आणखी एका संधीची मागणी करण्यात येत होती. त्यावरून ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता.
दरम्यान, संधी हुकलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्यानं काही विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहे, तर काही विद्यार्थी संभ्रामात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध
“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”
काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव
नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे