ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध

नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता देशात तिसरी लाट (Third Wave) येणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

पाश्चिमात्य देशात सध्या मोठ्या प्रमाणावर ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत आहे. जानेवारीत तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार ओमिक्राॅनच्या वाढत्या रूग्णसंख्येबाबत गंभीर असल्याचं दिसत आहे.

सध्या भारतात ओमिक्राॅनची रूग्णसंख्या 500 च्या पार गेली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट आणि ओमिक्राॅन यांच्या लक्षणांमध्ये फरक आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं ही वेगळी आहेत. त्यामुळे आता डाॅक्टरांची चिंता देखील कमी झाली आहे.

एखाद्या व्यक्तीला ओमिक्राॅनची बाधा झाली असेल तर प्राथमिक लक्षणांमध्येच समोर येतं. व्यक्तीच्या आवाजाच्या माध्यमातून ओमिक्राॅनची बाधा झाली की नाही हे जाणवतं.

मोठ्या आवाजात न बोलता आणि न ओरडता जर तुमचा आवाज इतरांना कर्कश आणि भसाडा वाटत असेल, तर ओमिक्राॅनची बाधा झाल्याची शक्यता आहे.

हा आवाज ओमिक्राॅनचं प्राथमिक लक्षण असू शकतं. घसा बसला आणि घशात खवखव जाणवत असेल, तर ही ओमिक्राॅनची प्राथमिक लक्षण आहेत, असं तज्ज्ञांंचं म्हणणं आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. शरीराचे तापमान वाढतं, असं दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”

काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव

नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे

“म्याव म्याव करणारे लपून बसलेत, गुन्हेगार लोक नेहमीच…”

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण