एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

मुंबई | एसटी कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी कोर्टाने एसटी कामगारांना 15 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

ढचे चार वर्ष राज्य सरकार एसटी महामंडळ चालवेल. त्यानंतर आर्थिक निकषाच्या आधारे पुढील निर्णय घेईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. याबाबत उद्या सकाळी 10 वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून सरकार आणि एसटी कामगारांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबतची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहाला दिली होती.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12 टक्क्यावरून 28 % करण्यात आला, घरभाडे भत्ता 7 %, 14 % 21 % वरुन 8 %, 16 % आणि 24% टक्के करण्यात आला तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये 5000, रुपये 4000 व रुपये 2500 अशी वाढ करण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 7000 ते 9000 रुपये वाढ झाली आहे आणि महामंडळावर दरमहा रुपये 63 कोटीपेक्षा जादा भार पडला आहे.

ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने घेतली असल्याची माहितीही परब यांनी सभागृहाला दिली होती.

कोर्टाच्या या निर्णयानंतर आता एसटी कर्मचारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्या सुनावणीनंतर कोर्टाकडून आणखी कोणते महत्त्वाचे आदेश दिले जातात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही” 

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय 

‘या’ 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज 

मोठी बातमी! संजय राऊतांचा सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; स्वगतासाठी बापाने हेलिकॉप्टर मागवला