मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून सीबीआय टीम याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती याप्रकरणी सुरुवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडली आहे.
ईडीला तपासादरम्यान रियाच्या मोबाईलमध्ये एका ड्र.ग डिलरचा नंबर मिळाला होता. तसेच ईडीनं रियाचं व्हाट्सअॅप चॅट सीबीआयसोबत शेअर केले आहेत. या व्हाट्सअॅप चॅटमधून ड्र.ग संबंधित अनेक गोष्टी समोर आल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा याप्रकरणी तपास करत आहे.
रियाच्या मोबाईलमध्ये सीबीआयला शोविक आणि सॅम्युअल मिरांडा सोबत ड्र.गविषयी तिनं केलेलं चॅटही मिळालं होतं. याच पार्श्वभूमीवर ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आता मोठं पाऊल उचललं आहे. ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एका टीमनं आज सकाळी लवकर रियाच्या घरी छापा टाकला आहे. तसेच ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची दुसरी टीम सॅम्युअल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे.
दोन्ही ठिकाणी ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम सध्या सर्च ऑपरेशन करत आहे. रियाच्या घरी तपासादरम्यान ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती कोणत्या गोष्टी लागतात का? हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.
ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांत प्रकरणी मोठी कारवाई करत बॉलीवूडमधील कलाकारांना ड्र.ग पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. परवेज खान उर्फ चिंकू पठाण हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना गां.जा सप्लाय करत असल्याचा एनसीबीला संशय होता. यामुळे मुंबईत दोन ठिकाणी छापा टाकत चिंकू पठाणलाही एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. तसेच चिंकू पठाणच रिया चक्रवर्तीला ड्र.ग सप्लाय करत असल्याचं बोललं जात आहे.
चिंकू पठाण बरोबरच एक मुलगीही ड्र.ग सप्लायरच्या चैनमध्ये असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. ही मुलगी कोण आहे, याचा शोध अद्याप एनसीबीला लागला नसून एनसीबीची टीम या मुलीचाही शोध घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?
आधी बेड मिळाला नाही, नंतर पार्थिवाची हेळसांड; पुण्याच्या माजी महापौराचा दुर्दैवी शेवट!
“सुशांतप्रकरणी भाजपचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे”
सुशांतसिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलाचा नवा धक्कादायक दावा
सुशांत प्रकरणी मोठी बातमी! 13 दिवसांच्या तपासानंतर अखेर सीबीआयचा महत्वाचा निष्कर्ष