रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविल्यापासून या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईल मधील अं.मली पदार्थांविषयीचं चॅट सीबीआयच्या हाती लागल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा याप्रकरणी तपास करत आहे. अशातच आता रिया आणि तिचा भाऊ शोविकचे धक्कादायक चॅट समोर आलं आहे.

रिया आणि शोविक मधील 15 मार्च 2020चं हे चॅट असून यामध्ये हे दोघे अं.मली पदार्थांविषयी बोलत आहेत. तसेच या चॅट मध्ये बड म्हणजेच गां.जाच्या फुलांचा उल्लेखही आहे. रिया आणि शोविक या चॅटमध्ये अं.मली पदार्थांविषयीची एक योजना आखत असल्याचं दिसत आहे.

या चॅटमध्ये रिया शोविकला तो दिवसातून चार वेळा धूम्रपान करतो त्यानुसार योजना बनव, असं म्हणत आहे. यावर शोविक तिला त्याला बडची गरज आहे का? असा प्रश्न विचारतो. शोविकला उत्तर देताना रिया म्हणते, होय त्याला बडची पण गरज आहे. यावर शोविक म्हणतो, ठीक आहे आपल्याला 5 ग्रॅम बड मिळू शकतं, एकूण 20 डुब्स.

रिया आणि शोविक मधील ड्र.ग्जविषयीचं चॅट समोर आल्यानं आता एनसीबी रिया आणि शोविकला चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते. तसेच बॉलिवूड मधील इतरही काही कलाकारांना याप्रकरणी एनसीबी चौकशीसाठी बोलावू शकते.

ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एका टीमनं आज सकाळी लवकर रियाच्या घरी छापा टाकला आहे. तसेच ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची दुसरी टीम सॅम्युअल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे.

दोन्ही ठिकाणी ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम सध्या सर्च ऑपरेशन करत आहे. रियाच्या घरी तपासादरम्यान ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती कोणत्या गोष्टी लागतात का? हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात

एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?

आधी बेड मिळाला नाही, नंतर पार्थिवाची हेळसांड; पुण्याच्या माजी महापौराचा दुर्दैवी शेवट!

“सुशांतप्रकरणी भाजपचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे”

सुशांतसिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलाचा नवा धक्कादायक दावा