मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारचा दणका

मुंबई | भाजप नेते नितेश राणे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं होतं. नितेश राणे जेलमधून बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे.

जुहू येथील अधिष या नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी पोलीस संरक्षणासह राणेंच्या बंगल्यावर गेले होते.

अशातच आता केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना खुद्द मोदी सरकारने दणका दिला आहे. राणेंच्या कोकणातील निलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे.

मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे परिवाराचा निलरत्न नावाचा बंगला आहे. केंद्र सरकारने याच बंगल्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार आल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता हे आदेश देण्यात आलेत.

महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आता नारायण राणे यांना मोठा झटका मानला जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कारवाईच्या इशारानंतर आता केंद्राने नारायण राणेंची साथ सोडलीये का?, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या –

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना न्यायालयाचा झटका, सुनावली ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

…म्हणून साई पल्लवीने धुडकावली 2 कोटी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर! 

‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं

डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा!