मोठी बातमी! राज ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली

औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. या सभेला परवानगी देत असताना राज ठाकरे यांना 15 अटी घालून दिल्या आहे. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

घालून दिलेल्या अटीचं पालन करून राज ठाकरे यांना सभा घेता येणार आहे. त्यामुळे आता राज्यात मोठा वाद रंगण्याची शक्यता आहे. परवानगी मिळाल्याने आता मनसेमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

राज ठाकरे यांना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. सभेवळी लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागेल.

इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी देखील अट आहे. सभेदरम्यान राज ठाकरे यांना कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.

1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश, जात यावरून वक्तव्य करता येणार नाही, अशी अट देखील लावण्यात आली आहे. व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही. सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, अशीही अट आहे.

दरम्यान, सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलेही वर्तन होणार नाही याची काळजी राज ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राज्यात…”, एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

राज्यात मास्क सक्ती होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…

हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…

रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली

हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज