‘माझ्यावरील हल्ल्याची CBI चौकशी करा’; किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई | खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्या भेटण्यासाठी निघाले होते.

मुंबईतील खार पोलिस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांवर हल्ला झाला होता. काच फोडून हनुवटीला जखम केल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.

आपल्यावर झालेल्या हल्ल्याची निपक्षपाती चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी करणारी याचिका किरीट सोमय्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

खार पोलिस स्टेशनमध्ये माझ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बांद्रा पोलीस स्थानकात एफआरआय दाखल करण्यासाठी गेलो होतो, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

तसेच माझे म्हणणे नोंदवून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक शांताराम देवरे यांनी जी वस्तुस्थिती आहे त्यासंदर्भात विपर्यास करणारा एफआरआय दाखल केला.

सदर एफआरआय विरूद्ध मी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे देखील तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून हल्ल्याची योग्य पद्धतीने चौकशी होत नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्यांनी सदर याचिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि दिपक पांडे यांची तक्रार केली आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांना तात्काळ अटक करा, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी माझ्यावर खोटा एफआयआर दाखल केला. याविरूद्ध उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून तात्काळ सुनावणी करा, अशी विनंती केल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राज्यात…”, एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

राज्यात मास्क सक्ती होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…

हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…

रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली

हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज